नवी मुंबई

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून नवी मुंबईकरांसाठी सुरु झालेल्या नव्या पासपोर्ट कार्यालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

वाशी येथे नवी मुंबईकरांसाठी पासपोर्ट कार्यालय सेवा सुरु करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन वाशी येथे आज पासपोर्ट कार्यालयाचे शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनेते विजय नाहाटा, आमदार मंदाताई म्हात्रे, विजयराव चौघुले, आमदार रमेश पाटील, जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मोरे, द्वारकानाथ भोईर, रामचंद्र घरात, रंजनाताई शिंगरे, हरिश्चंद्र अग्रवाल, तुलसीदास शर्मा, अजय सिंग, मनोज रॉय आदी उपस्थित होते.

यापूर्वी नवी मुंबईकरांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे किंवा बीकेसीला जावे लागत होते. परंतु आत्ता या कार्यालयामुळे नवी मुंबईकरांना पासपोर्ट काढण्यासाठी बीकेसी अथवा ठाण्याला जायची गरज पडणार नाही. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार असून त्यांच्या वेळेची बचत होणार आहे तसेच पासपोर्ट १० – १५ दिवसांच्या कालावधीत मिळतील, असे आश्वासन राजन विचारे यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button