Mumbai

मुंबईकरांनो सावधान! 14 ते 18 जुलैदरम्यान समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा; BMC कडून सतर्कतेचे आवाहन

मुंबईत येत्या 14 ते 18 जुलैदरम्यान मोठ्या भरतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, भरतीच्या काळात समुद्रकिनारे आणि किनारी भागांमध्ये अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत भरतीची उंची 4.57 मीटर ते 4.66 मीटर दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

18 जुलैला सर्वाधिक भरतीची नोंद

BMC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 18 जुलै रोजी दुपारी 3 वाजता 4.66 मीटर उंचीची मोठी भरती येण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील ही सर्वाधिक भरती असणार आहे.

पुढील पाच दिवसांचे भरती वेळापत्रक

14 जुलै (मंगळवार) – दुपारी 12.04 वाजता, 4.57 मीटर
15 जुलै (बुधवार) – दुपारी 12.51 वाजता, 4.58 मीटर
16 जुलै (गुरुवार) – दुपारी 1.36 वाजता, 4.61 मीटर
17 जुलै (शुक्रवार) – दुपारी 2.19 वाजता, 4.63 मीटर
18 जुलै (शनिवार) – दुपारी 3.00 वाजता, 4.66 मीटर

जुलै २०२६ मधील मोठ्या भरतीचे (High Tide) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १४ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असणार आहे 🌊

भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा…

सुरक्षित राहा, सतर्क राहा!#MyBMCUpdates #MumbaiRains #Hightide pic.twitter.com/RuhUaPsSFB— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2026

समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळण्याचे आवाहन

महापालिकेने नागरिकांना मोठ्या भरतीच्या दिवसांत समुद्रकिनारे, खडकाळ भाग आणि किनारी परिसरात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरतीच्या काळात समुद्राच्या लाटा अचानक उंचावू शकतात, त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.

पोलिस आणि प्रशासनाकडून देखरेख

मुंबई पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संवेदनशील किनारी भागांवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button