कोरोना अपडेट : बुलढाण्यात एका दिवसात सापडले २०० च्यावर कोरोनाबाधित !
बुलढाणा : जिल्ह्यात तब्बल २७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांचा आकडा आता १५, ६३० इतका झाला आहे. बुलढाणा येथे एका वयाच्या सत्तरी पार केलेल्या वृद्धेचा आणि चिखली येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १८३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे तर १४,३९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १५२ रुग्ण हे कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.
भारतात १२,६४३ नवीन कोविड -१९ केसेस नोंदविण्यात आल्या. भारतात सक्रिय प्रकरणे ७७,८६६ आहेत, तर प्रकरणांची संख्या वाढून १,०९,६२,१८९ एवढी झाली आहे. देश जागतिक स्तरावर दुसर्या क्रमांकावर सर्वाधिक परिणामग्रस्त ठरला आहे आणि सक्रीय घटनांमध्ये सर्वात जास्त प्रभावित देशांमध्ये १७व्या क्रमांकावर आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कोरोना लस १,९९,३०५ एवढ्या नागरिकांना देण्यात आली आहे, असे माहितीनुसार कळते.