Monsoonपुणे

पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

मागील पंधरा दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील कळमोडी हे धरण आज पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. सध्या 1.51 टीएमसी पाणीसाठा या धरणात असून हे पुर्ण क्षमतेने भरलेले जिल्ह्यातील पहीले धरण आहे. कळमोडी धरणातून सुमारे शंभर क्‍युसेस वेगाने पाणी खाली कोसळत असल्याने आरळा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले. या नदीचे पाणी आता चास – कमान धरणात येत असुन चास – कमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चास – कमान धरणात ३० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button