बृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी ऑनलाईन सेवा सुरू

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणतः १२ हजार छोटी – मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या मंडळांना आपल्या मंडळाच्या परवानगीसाठी मुंबई महानगरपालिकेने १५ जुने रोजी ऑनलाईन सेवा सुरु केली. या ऑनलाईन सेवेमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस, वाहतूक पोलीस अथवा अग्निशमनदलाकडे परवानगी घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे महापालिकेने सांगितल

हे अर्ज करण्यासाठी या गणेश मंडळांना महानगरपालिकेच्या वेबसाईटचा वापर करावा लागणार आहे म्हणजेच www.mcgm.gov.in या वेब पोर्टलचा वापर करावा लागणार आहे. या वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा उपलब्ध आहे. जेणे करून मंडळांना हे अर्ज भरताना कोणता अडथळा येणार नाही. या ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०१९ असून महापालिकेने सर्व गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर अर्ज सादर करावे अशी सुचना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button