Moviesमनोरंजनसेलिब्रिटी

मन कस्तूरी रे चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले ! लवकरच पडद्यावर येण्याची शक्यता !

मुंबई: रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे, अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालंय. त्यानं सोशल मिडीयाद्वारे ही माहिती दिली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन संकेत माने यांनी केलंय.तर सुमीत गिरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहीले आहेत.
प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या सिनेमाचं चित्रीकरण पूर्णपणे मुंबईत झालं आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक संकेत माने म्हणाले, “कोरोना काळात अतिशय सावधानता बाळगून ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झालं होतं. या सिनेमाचं चित्रीकरण मुंबईमधील लालबाग, भांडूप, ठाणे, मिरारोड अश्या लाईव्ह लोकेशनवर करण्यात आलंय.

इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस ,वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे निर्मित, संकेत माने दिग्दर्शित-लिखीत, ‘मन कस्तुरी रे’ सिनेमात अभिनय बेर्डे झळकणार आहे. सध्या इतर कलाकारांची नावे रिवील केलेली नाहीत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button