सामाजिक कौशल्ये अशी आत्मसात करा !
या जगात स्व:ताचे नाव सिद्ध करण्यासाठी तसेच टिकण्यासाठी आपल्याला वावरायचे कसे , कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे या सगळ्या गोष्टी येणे महत्वाचे असते. बर्याचदा शाळा कॉलेजमध्ये आपल्याला या गोष्टी शिकवल्या नाही जात आणि व्यक्तिमत्व विकास हा फारसा कमीच होतो. बहुतांश लोकांकडे हे कौशल्य पहिलेच असते पण काहींना हे आत्मसात करावे लागते. या गोष्टी आत्मसात करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते असे नाही पण सवयी या नियमितपणामुळे लागतात आणि त्या अंगी बाणवून घ्याव्या लागतात.
१. सुरुवात घरच्यांपासून करा !
जर तुम्ही लाजऱ्या स्वभावाचे असाल तर पहिले सुरुवात ही घरच्यांपासून करा. त्यांच्याशी बोलायला लागा. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा अगदीच नाही तर दररोजच्या बातम्यांबद्द्ल बोला. हळूहळू ही गोष्ट वाढवत मित्रपरिवार आणि काम मिळाल्यावर सहकार्यांशी संवाद करायला लागा.
२. प्रश्न विचारा
बर्याचदा आपण कोण काय बोलेल किंवा आपल्याला मूर्ख ठरवेल या भीतीने प्रश्न विचारत नाही. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रश्न विचारणे हे खूप म्हत्वाचे असते, जर तुम्ही प्रश्न विचारले नाहीत तर तुम्हाला तुमच्यात कुठे सुधारणा करायची आहे हे कळणार कसे ? त्यामुळे प्रश्न विचारायला लागा. यामुळे आणखी एक होते म्हणजे संवाद वाढतो.
३. देहबोलीवर लक्ष ठेवा
देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज. हा सामाजिक कौशल्याचा एक महत्वपूर्ण भाग असतो. भाषारहित संवादास देहबोली ही उपयुक्त असते. जसेकी डोळ्यात डोळे घालून बोलणे हे आत्मविश्वास दर्शवतात, ताठ बसणे तुमची जागरूकता दाखवतात. यामुळे तुम्ही देहीबोलीवर सुद्धा लक्ष ठेव्याला पाहिजे.
४. नकारात्मक गोष्टी टाळणे
आपल्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण हे नकारात्मक विचार करतात. याने होते असे की मानसिक दृष्ट्या आपण खचतो व समाजात किंवा बाहेर आपल्याला नीट वागता येत नाही. त्यामुळे या गोष्टी, असे विचार शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.