Maharashtra Govजिल्हा परिषदशिक्षण

विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यास मिळणार वाहतूक भत्ता

शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. घरापासून दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

राज्यातील ज्या गावांमध्ये वस्तीमध्ये किंवा वाड्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून एक किमीपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत तीन किमीपर्यंत शाळा नसल्यास वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.

त्यामुळे अशा गाव/ वस्ती/ वाडे यांची नावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसाच्या आत समग्र शिक्षा कार्यलयास सादर करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक केंद्रामध्ये विखुरलेल्या व कमी पटसंख्या असलेल्या प्रत्येक केंद्रातील तीन शाळा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांनी नियोजन करायच्या सूचनाही देण्यात आला आहेत.

याकरता, शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या राहत्या घरांची माहिती प्राथमिक शिक्षण संचलनालाय पुणे या ठिकाणी पाठवायची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button