Sportsक्रिकेटक्रीडा

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची घोषणा, संघात एकूण 4 बदल

भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पत्रकार परिषदेत त्याने दुसऱ्या कसोटीसाठी संघातील बदलांबद्दल माहिती दिली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन यालाही संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

फास्टर बोलर जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. तर जेम्स अँडरसनलाही वगळण्यात आलं आहे. आर्चर आणि अँडरसनच्या जागी संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सला संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू डॉम बेसला डच्चू देत मोईन अलीला स्थान देण्यात आलं आहे. बेसने पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. तर आक्रमक फलंदाज असलेल्या जोस बटलरलाही वगळण्यात आलं आहे.इंग्लंड टीम मॅनेजमेटंने या दुसऱ्या कसोटीसाठी नव्या दमाच्या 2 खेळाडूंना संधी दिली आहे. ओली स्टोन आणि बेन फोक्स या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ खेळाडूंचा संघ

जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन फोक्स आणि ऑली स्टोन.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button