शेतकरी, महिला आणि गाव- शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भारताला उच्च शिक्षणाचा केंद्र बनविण्याचा संकल्प, खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिक्षा बोर्ड स्थापन करण्याचा मनोदय, पायाभूत सुविधांच्या जोडणीवर दिलेला भर, हर घर जल सारखा नाविन्यपूर्ण कार्यक्रम, विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया कार्यक्रम, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कराबाबतची सुलभता आदींच्या माध्यमातून देशाच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने भरीव प्रयत्न केल्याचे दिसून येते. सर्वच क्षेत्रांना न्याय देणारा सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक व देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करतो असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ योजनेत डबेवाला कामगारांनाही संधी द्या; मुंबई डबेवाला असोसिएशनची प्रवीण दरेकरांकडे मागणी
1 day ago
खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे
मेट्रो लाईन ६ कनेक्टीव्हीटी तसेच सर्विस रस्त्यामधील बाधित सुमारे १४६ कुटुंबांचे जोगेश्वरीतच पुनर्वसन
May 22, 2026

