Monsoonताज्या बातम्याहवामान

Maharashtra Rain Update : 5 जुलैपर्यंत राज्यभर पावसाची हजेरी, ‘या’ भागांत अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात अखेर मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मुंबई, कोकणासह अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. अशातच पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी येत्या 24 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ही स्थिती येत्या 5 जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार

21 जूनपासून पावसाच्या तुरळक सरी बरसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 24, 25 आणि 26 जून तसेच 27 ते 30 जूनदरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डक यांनी व्यक्त केली आहे. या काळात शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी पोषक वातावरणही तयार होणार आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसेल असाही अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

2 ते 20 जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. येत्या 5 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन होईल. एल निनोची स्थिती जरी असली तरीही राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचा दावा डख यांनी केला आहे. यामुळे येत्या 2 ते 5 जुलैदरम्यान राज्यातील काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. पुणे, मुंबई, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो. यामुळे धरणे, जलाशये यांच्यामधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विदर्भात 27 जूनपर्यंत दमदार पाऊस

विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे. ही स्थिती 27 जूनपर्यंत कायम असेल असे डक यांनी म्हटले. (Maharashtra Rain Update)

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस सक्रिय

मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत लवकरच पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पुढील दहा दिवसांत दमदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातही 5 जुलैपर्यंत सर्वत्र पावसाची हजेरी लागेल, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button