Health & Fitnessमुंबई

‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्याला कोरोना; ठाकरे कुटुंबाला खबरदारीचा सल्ला

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वांद्रे येथील निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’ बाहेरील चहावाल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. मात्र आता ‘मिडडे’ या वृत्तपत्रानूसार मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याचा थेट संपर्कात आलेले नाही . मात्र ठाकरे कुटुंबीयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे .मुंबईत काल दिवसभरात १ हजार ११७ नव्या रुग्णांची भर पडल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४२ हजार २१६ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ४९ रुग्णांनी आपला जीव गमावल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ३६८ वर गेली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button