इतरलाइफस्टाइललाईफस्टाईललेख

मनी वसे ते स्वप्नी दिसे , ही स्वप्न आपल्याला पडतात कुठून?

चांगली आणि वाईट अशी अनेक स्वप्न आपल्याला पडतात आपण त्यांचा अर्थ दरवेळी लावायला बघतो पण तो काही लागत नाही. एवढच काय काही स्वप्न तर अशी असतात की त्यात आपण आपला मृत्यू देखील पाहतो तर काहीतरी अघटित प्रसंग सुद्धा पाहतो. या स्वप्नांवर अनेक विचारवंतांनी अनेक शोध रचले, आता तर स्वप्न हा एक मनोरंजनाचा सुद्धा भाग होऊन गेलाय या स्वप्नांवर अनेक चित्रपट, वेब सिरीस आणि इतर गोष्टीही बनल्या आहेत. तर ही स्वप्ने आपण का पाहतो आणि आपल्याला कशी पडतात हे पाहून घेऊ!

आपल्याला स्वप्न का पडतात ?

या गोष्टीला जरी तथ्य असणारे असे उत्तर नसले तरी त्याचे वेगवेगळे तर्क बऱ्याच शाश्त्रज्ञांनी केले आहे. काही लोकांचे असे मानणे आहे की स्वप्ने म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एक क्रम असतात जो आपल्याला रात्री सलग दिसतो. या घटना जर ताणतणावाने भरलेल्या असल्या तर तर वाईट स्वप्न पडण्याची शक्यता असते. काही लोक असे मानतात की स्वप्न ही मनुष्याचा आंतरिक स्वभाव दाखवतात म्हणजेच मनात जे विचार एकदा व्यक्ती लपवून ठेवतो त्याचे ते विचार त्याला स्वप्नात दिसतात. काहींचे असे म्हणणे आहे की स्वप्ने आपल्या भावना आणि आपले ‘मूड्स’ व्यवस्थित करण्यासाठी असतात आणि शेवटचे जे आपल्यासारखे असतात की ‘ मनी वसे ते स्वप्नी वसे ‘ हे मानणारे.

काही प्रसिद्ध विचारवंतांनी आपल्या स्वप्नांच्या बाबतीतच अनुभव सांगितले आहे. मार्गारेट अटवूड ज्या कॅनडियन कवी आहेत त्यांनी त्यांच्या स्वप्नाच्या बाबतीत असा सांगितलं की ‘स्वप्नांमधील वेळ हा थांबलेला असतो. तुम्ही तिथून कधीच बाहेर येऊ शकत नाही’ (Time in dreams is frozen. You can never get away from where you ‘ve been). तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा ठोस अर्थ तर्कशुद्ध पद्धतीने जर काढायचा आहे तर उठल्यावर ती स्वप्ने लिहून ठेवणे हेच चांगले.

स्वप्नांच्या बाबतीत काही महत्वाच्या बाबी बघू

१. आपल्याला रात्री ते सकाळपर्यंत झोपेत निदान ३ ते ६ वेळा तरी स्वप्ने पडतात

२.या स्वप्नांचा अवधी हा ५ मिनिटे ते २० मिनिटे असा असू शकतो.

३. जवजवळ ९५% आपण आपले स्वप्न उठल्यावर विसरून जाण्याची शक्यता असते.

४. स्वप्न तुम्हाला तुमच्या आठवणी जतन करण्यास मदत करतात.

असे म्हणायला हरकत नाही की आपल्या आठवणी, आपल्या इच्छा , आपले आंतरिक मन या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला मेंदू दाखवत असतो असे म्हणण्यास हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button