मुंबई

उद्योग मंत्री सुभाष देसाईंने केले महिला उद्योजकांचे कौतुक

आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त लघु उद्योग व निर्यात पुरस्कार वितरण सोहळा उद्योग विभाग व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योग धंद्यांमध्ये महिला उद्योजकांचा मोठा सहभाग असून उद्योग व्यवसायात राज्याला अग्रक्रम मिळवून देण्यात महिला उद्योजकांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले.

 

‘राज्यातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा हा चांगला ठेवल्यामुळे विदेशातही राज्यातील उत्पादनाला मागणी असल्याचे दिसून येते. येथील उत्पादनाला असलेली विदेशाची मागणी यामुळे निर्यातीमध्येही राज्य अग्रेसर आहे. उद्योजकांनी आपल्या उद्योगाची क्षमता व गुणवत्तेमध्ये सातत्य ठेवून निर्यात वाढविण्यावर भर द्यावा’, असे देखील देसाई म्हणाले. या वेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, रुपा नाईक तसेच राज्यातील उद्योजक व नवउद्योजक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button