Maharashtra Gov

मास्क न वापरणाऱ्यांवर बीएमसी करणार कारवाई!

मुंबई: लोकल प्रवासात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या चुकार प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . मुंबईत करोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर असताना त्यास रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये लॉक डाऊन नुकताच शिथिल झाल्यावर कोरोनाची भीती पुन्हा वाढली आहे. राज्यात पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता असताना आता बीएमसी ने लोकल ट्रेन मध्ये मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
 
अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी लोकल प्रवासात मार्शल नियुक्त करून कारवाई केली जाणार आहे.
 
वेस्टर्न आणि मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान ४६18 प्रवासी मध्य (सीआर) आणि पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) वर फेस मास्कशिवाय प्रवास करीत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने (सीएसएमटी) नोंद केली आहे. या कोविड-सेफ्टी प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारी सर्वाधिक संख्या. सीआर वर ₹ 1.21 लाख व डब्ल्यूआर वर ₹ 3.28 लाख वसूल करुन आतापर्यंत दंड गोळा केला गेला आहे.
 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button