EnvironmentMaharashtra Govआरोग्यपुणेपुणे महानगरपालिका

पुण्यात २, ६४९ टन वैद्यकीय कचरा ! कोरोना काळात वाढल्याची शक्यता

पुणे: शहरात आतापर्यंत २,६४९ टन जैव वैद्यकीय कचर्याची निर्मिती झाली असून , त्यापैकी एक हजार ७५ टन कचरा हा केवळ कोरोनामुळे झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच मार्च २०२० ते जानेवारी २०२१ ची आकडेवारी दिली आहे. रुग्णांच्या उपचारा दरम्यान वापरण्यात आलेला पीपीई कीट, मास्क, औषधे, इंजेक्शन यांसारख्या वैद्यकीय साधनामुळे गेल्या अकरा महिन्यातील ही एकत्रित आकडेवारी आहे.

पिंपरी चिंचवड येथे सप्टेंबर २०२० मध्ये ५५ टन जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला होता तर पुण्यात १९८ टन कचरा निर्माण झाला होता. गेल्या महिन्यात केंद्रीय प्रदूषण मंडळाने जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यात सगळ्यात जास्त कोविड- १९ जैव वैद्यकीय कचर्याची निर्मिती झाली होती. हा कचरा काही प्रमाणात मुंबईतील तळोजा कचरा प्रकल्पाला पाठविण्यात येत होता आणि तिथे कचर्याचे व्यवस्थापन करण्यात आले.

हा वैद्यकीय कचरा गोळा करण्यास तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यास वाहने आणि मनुष्य बळ यांची कमतरता होत असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. तसेच या वाढत्या कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा सुविधा चांगल्या नाहीत त्यामुळे हे होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button