पिंपरीतील पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता!
पिंपरी: शहरातील छुप्या मिळकतींचा शोध हा सध्या पिंपरी पालिका घेत आहे. हा शोध सुरु केल्यानंतर तब्बल ५० हजार मिळकती आढळून येण्याची शक्यता पालिका सांगत आहे. या माध्यमातून पालिकेचे उत्पन्न १५० कोटींनी वाढू शकेल असाही अंदाज पालिका वर्तवते. या मध्ये विवध मोबाईल कंपन्यांचे टॉवर हे आकारणीशिवाय होते असे आढळून आले. त्यामुळे यांच्या आकारणीतून पिंपरीतील मिळकत वाढू शकते.
सद्य परिस्थितीत शहराची मिळकत ही ५ लाख ४० हजार इतकी आहे. नवी बांधकामे, वाढीव बांधकामे या सर्वांचे पालिकेने सर्वेक्षण करण्यास नोव्हेंबर २०२० पासून सुरुवात केली. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झाला व हे सर्वेक्षण थांबले.
आता परत सर्वेक्षण चालू करण्याचे काम हे पालिकेने सुरु केले आहे. यातून पालिका असा अंदाज सांगते की सुमारे ५०० मोबाईल कंपन्यांचे टॉवर त्यांची नोंद महापालिकेकडे आहे पण अजून ६०० टॉवर हे नोंदणीशिवाय बांधले गेलेत. यावरूनच पालिकेकडे १५० कोटींची मिळकत जमू शकते.


