शिक्षण

कोरोना योद्धयांच्या मुलांसाठी मेडिकल प्रवेशांत राखीव जागा

कोरोना महामारीचा प्रसार रोखणे आणि या आजाराच्या रुग्णांवर उपचार करणे यासाठी काम करणाºया कर्मचाºयांच्या मुलांना ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या वैद्यकीय तसेच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राखीव जागा ठेवल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या नव्या आरक्षणला संमती दिली आहे. हे आरक्षण केंद्र सरकारच्या कोट्यातील जागांमध्ये ठेवले जाईल.

या आरक्षणामुळे निस्वार्थ भावनेने सेवा देणाºया ‘कोरोना योद्धयांच्या त्यागाचा गौरव होईल, असे डॉ. हर्षवर्धन ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मात्र या आरक्षणाचे प्रमाण किती असेल, हे त्यांनी सांगितले नाही.

‘कोरोना योद्धे’ म्हणजे नेमके कोण, याची नेमकी व्याख्याही सरकारने अद्याप केलेली नाही. परंतु सर्वसाधारणपणे डॉक्टर, परिचर्या कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस इत्यादींचा उल्लेख ‘कोरोना योद्धे’ असा करण्याची प्रथा ही महामारी सुरु झाल्यापासून पडली आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यांची झळ पोहोचलेल्या लोकांच्या मुलांनाही ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’ प्रवेशांत प्रवेश देण्याचा निर्णय  सरकारने याआधीच घेतला आहे. यात दहशतवाद रोखण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा दलांतील कर्मचारी, दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर असलेल्यांची मुले आणि  सध्याच्या परिस्थितीमुळे काश्मिर सोडून अन्यत्र स्थलांतर कारवे लागल्याने उपजिवीकेचे साधन नसलेले लोक यांचा समावेश असेल.

पंजाबमधील चंदिगढ आणि फगवाडा या दोन विद्यापीठांनीही कोरोना योद्धयांच्या मुलांना सवलती देण्याचे जाहीर केले आहे. चंदिगढ विद्यापीठ त्यांच्यासाठी प्रवेशांमध्ये १० टक्के राखीव जागा ठेवणार आहे आणि फीमध्ये १० टक्के सवलत देणार आहे तर फगवाडा विद्यापीठ कोरोनाबाधितांच्या व कोरोना योद्धयांच्या मुलांना विमामूल्य शिक्षण देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button