Congressसोशल मीडिया

काँग्रेसमध्ये ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ची मेगा भरती

मुंबई: भाजपाच्या सोशल मीडियावरच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ची मेगा भरती केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजीत सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ४८ जिल्हाध्यक्ष, २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ प्रदेश कार्यकारिणी सदस्य व १ कोअर कमिटी सदस्य आहेत.

२०१९ च्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याचे व लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मीडिया विभागाने अतिशय प्रभावीपणे केले. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेगा कार्यकारिणी करेल असा विश्वास अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या ४२८ पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button