किणी तासवडे, आणेवाडी आणि खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर वाहनांना सवलत देण्याचा निर्णय – सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर-सांगली अपडेट
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. पूर ओसरल्यानंतर ही सर्व वाहने एकदम रवाना होऊन टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत किणी तासवडे, आणेवाडी आणि खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर वाहनांना सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री. शिंदे गेले दोन दिवस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरात तळ ठोकून आहेत.
या सर्व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, जेवण, वैद्यकीय सेवा व औषधांचा पुरविण्यात येत असून या व्यवस्थेची पाहणी केली. #MaharashtraRains #Maharashtraflood @AUThackeray pic.twitter.com/yX7j39luKY
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 9 August 2019
