Maharashtra Govआरोग्यमुंबई

प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार; तब्येत अगदी ठणठणीत, स्व-विलगीकरणात नाही : राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणामदेखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणेदेखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button