Maharashtra Govमुंबई

आजपासून उद्यानात जाण्यास परवानगी, मात्र व्यायामाची उपकरने वापरण्यास बंदी

मुंबई : रेड झोनला “अनलॉक” करण्याबाबतच्या अधिसूचनेत गुरुवारी राज्याने दुरुस्ती जारी केली. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा फक्त कटेंनमेंट झोनपुरताच मर्यादित असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासंबंधीची नियामावली राज्य सरकारकडून आज जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ‘मिशन बिगिन अगेन’च्या पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आल्या आहेत.

आता बाजारपेठांमधील दुकानंही सशर्त सुरु होणारम आहेत. मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता बाजारपेठांमधील दुकानं ही सम- विषम तारखेच्या तत्वावर सुरु राहतील. कपडे खरेदीसाठी गेल्यास अशा दुकनांमध्ये ट्रायल रुमचा वापर मात्र करता येणार नाही. थोडक्यात निर्मनुष्य पडलेलं बजारपेठांचं चित्र आजपासून बऱ्याच अंशी बदलेलं असणार आहे. मुंबईसह रेड झोनमधील १९ महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये खासगी कार्यालये ८ जूनपासून दहा टक्के किंवा दहा यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या उपस्थितीने सुरू करता येतील. उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय राहील.

कोणत्याही प्रकारच्या व्यायामासाठी बाहेर पडलं असता ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत. ज़ॉगिंगसाठी सहजपणे घराबाहेर पडणं शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याव्यतिरिक्त वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्याचीही परवानगी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button