MonsoonRailways

मध्य रेल्वे आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार

गेल्या १४ ते १६ तास ठप्प असलेल्या मुंबई लोकलने आज पुन्हा आपला मार्ग धरला असला तरी मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक सुरू केल्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला असून डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. रविवारी प्रवाशांची संख्या कमी असतानाही लोकलमध्ये रेटारेटीचा अनुभव मुंबईकरांना येत असतो. अशात आज मुंबईकरांचा नेहमीचाच धावपळीचा दिवस आणि त्यात लोकलची संख्या कमी असल्यामुळे सर्वच प्रवाशांची तारांबळ उडाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button