हा चहा घेतल्याने आजार राहतात दूर
भारतीय लोकांना चहा हा भलताच प्रिय असतो. आसाम मध्यल्या चहाचे दृश्य प्रत्येक टीव्ही वर दिसते. चहा चे गुणधर्म
तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जसे की तरतरी येणे, आल्याच्या चहाने सर्दी जाणे. आणि आता कारोनाच्या
काळात तर आयुष काढा हा एक नवीनच चहा लोकां समोर आला. या चाहामुळे लोकांची प्रकृती तसेच कोरोनाशी सामना
करण्याची ताकद वाढली. त्यामुळे चहाचे नवीन प्रकार सध्या खूप प्रसिद्ध होत आहेत त्या पैकी एक प्रकार आहे ग्रीन टी.
ग्रीन टी हा सध्याचा प्रचलित आणि प्रसिद्ध चहाचा प्रकार आहे. ज्याचे फायदे अनेक आहेत. आणि काही शास्त्रज्ञ हा दावा
करतात की ह्याने हृदय विकार कमी होतात.
१. ग्रीन टी ने हृदय चांगले राहते
हे वाचल्यावर जस आश्चर्य वाटते पण हे चक्क शास्त्रज्ञ सांगतात. ग्रीन टी ही कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे
रक्त पातळ राहून घट्ट होत नाही. जपान मध्ये ४०, ५३० प्रौढ व्यक्तींनी दररोज ५ कप ग्रीन ती नेहमी
प्यायली या सर्वेक्षणात असे दिसून आले की २६% व्यक्तींना हृदयाचे आजाराचे प्रमाण कमी झाले तुलनात्मक ज्यांनी ग्रीन
टी नाही घेतली. जर तुमचं हृदय तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला ग्रीन टी घ्यायला हरकत नाही.
२. वजन कमी होण्याची शक्यता
वाजांनकामी करण्यासाठी बघत आहात का? व्यायाम करून जिम ला जाऊन कंटाळा येतो का? तरी वजन कमी नाही
होत, भूक नाही लागत? ग्रीन टीच सेवन करा! ग्रीन टीने वजन कमी होण्यास मदत होते कारण ग्रीन टी ही भूक वाढवते
आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. जेणेकरून आपोआप वजनावर नियंत्रण येते.
३. त्वचाविकार आणि सोरायसिस
जॉर्जिया मेडिकल स्कूल ने केलेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले की ग्रीन टी ही सोरायसिस सारख्या आजारावर
नियंत्रण आणण्यास मदत करते. ही पेशींची जास्त होणारी वाढ कमी करण्यास व त्यांना नियमित करण्यास मदत करते.
अशी ही ग्रीन टी ही बुद्धिमत्ता तल्लख ठेवायला सुद्धा मदत करते. चहा प्रेमींसाठी हा नवा प्रकार नक्कीच फायदेशीर ठरू
शकतो.