Travelमुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री राबविणार ‘टुरिझम पोलीस’ संकल्पना

यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण 50 औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली. तसेच राज्यातील पर्यटनाच्या विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. जागतिक व्यापार केंद्राच्या वतीने आयोजित वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात रावल बोलत होते. यावेळी जागतिक व्यापार केंद्राचे चेअरमन कमल मोरारका, न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राचे संचालक व मुंबईचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष शरद उपासनी, महासंचालक वाय. आर. वरेरकर, वरिष्ठ संचालक रुपा नाईक, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button