Maharashtra Govबृहन्मुंबई महानगरपालिका - BMC

मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांना आठ तास पुरेल एवढा डिझेलचा साठा करण्याचे निर्देश

मुंबई : पॉवर ग्रीडच्या बिघाडामुळे मुंबईसह उपनगरातील वीज पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे मुंबईतील संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली होती. दरम्यान, याचा फटका रुग्णालयांना बसला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी रुग्णालयांना डिझेलचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणाले की, ग्रिड बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला असताना मुंबईतील रुग्णालयांना विशेषत: आयसीयूची यंत्रणा बिघडू नये यासाठी किमान आठ तास डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चहल यांनी निवेदनात म्हटले आहे की, “रुग्णालयांमध्ये विशेषत: आयसीयूमध्ये बिघाड होऊ नये म्हणून कमीतकमी आठ तास डिझेलचा पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित रुग्णालयांनी संबंधित एसडब्ल्यूएम ट्रान्सपोर्ट गॅरेज अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. काही समस्या असल्यास कृपया संपर्क साधावा. सोबतच मुंबई महापालिकेने अत्यावश्यक मदतीसाठी हेल्पलाीन नंबर जारी केले आहे. महापालिकेने नागरिकांसाठी 022-22694727, 022-226947725, 022-22704403 हे इमरजन्सी नंबर जारी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button