Maharashtra GovPoliceमुंबई

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज NCB कडून अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात म्हणजेच संध्या ४.३० वाजता रियाची मेडिकल टेस्ट होणार आहे. NCB कडून तब्बल ५ तास झालेल्या चौकशीनंतर आता रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला मिळालेल्या ड्रग अँगलच्या पार्श्वभूमीवर रियावर NCB कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं आहे. रविवारी सुरू असलेल्या चौकशीत एनसीबीची टीम रियाला अटक करेल असं वाटत होतं मात्र रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आलं.

एनसीबीची टीम सध्या रियाच्या अटकेचा मेमो तयार करत आहे. एकदा अटकेचा मेमो तयार झाल्यावर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेले जाईल. सध्या ती एनसीबी पथकाच्या ताब्यात आहे. असं सांगितलं जात आहे की, आता कागपत्रांची जुळवाजुळ सुरू आहे आणि त्यानंतर रियाची मेडिकल आणि करोना टेस्ट केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर रिया चक्रवर्ती यांना अटक केली जाईल.

आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. तसंच ती स्वतः अमली पदार्थांचं सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button