BJPराजकारण

दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे करणार भाजपात जाहीर प्रवेश

दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे करणार भाजपात जाहीर प्रवेश

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आपण भाजपात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे.

ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button