FeaturedLokSabha

जम्मू-काश्मीर कलम ३७० मुक्त – जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक ३५१ विरुद्ध ७२ मतांनी लोकसभेतही मंजूर

 

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत ३५१ विरुद्ध ७२ मतांनी मंजूर

• राज्यसभेपाठोपाठ आज लोकसभेतही कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक विधेयक ३५१ विरुद्ध ७२ मताने मंजूर करण्यात आलं.
• त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
• ही दोन्ही विधेयकं मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे काश्मीर ३७० कलम मुक्त करण्याचं भाजपचं स्वप्न साकार झालं आहे.

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा लवकरच
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल, असं अमित शहा यांनी सांगितलं. लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतरही त्यांची विधानसभा नसेल.

लोकसभेत २८० तास चर्चा
सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचं, जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत मांडलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button