Maharashtra Govमुंबईशिक्षण

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या चळवळीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल.

खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजनांसाठी यंत्रणा उभारण्यात येईल. तसेच राज्य शासन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती दिली जात असल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button