MNSमुंबई

बंद करा ती कोरोनाची कॉलर ट्यून ; मनसे नेत्याची मागणी

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली आहे.

नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटले की , कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही.

“जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी” अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

दरम्यान ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी “आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत होती, तर आता “देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे, तरी आपण गरज नसताना घराबाहेर पडू नये” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button