क्रीडा

धोनीला ७ व्या क्रमांकावर उतरवण्याच्या वादावर रवी शास्त्रींने मौन खोलले

महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडलं आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असं स्पष्टीकरण शास्त्रींनी दिलं आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचं त्यावर एकमत होतं. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरे असे की धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असं तुम्हाला वाटतं का?, असा सवालही शास्त्रींनी केला.

सेमीफायनलच्या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या होत्या, पण धावा घेण्याच्या नादात तो बाद झाला आणि भारताची जिंकण्याची सर्व आशा मावळली. त्यामुळेच सुनील गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी हा खुलासा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button