Maharashtra Gov

कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड!

मुंबईः रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे.

जैश उल हिंद संघटनेनं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात संघटनेनं स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुप घरी पोहोचले आहेत, असा दावा केला आहे. तसंच, हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असं म्हणत मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जर अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या वेळी मुलाच्या कारवर हल्ला करु, अशी धमकीही दिली आहे.

‘या पुढे तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितले आहेत ते ट्रान्सफर करा आणि तुमच्या ‘फॅट किड्स’ सोबत आनंदात राहा,’ असंही या पत्रकात लिहलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button