भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात लाजीरवाणा पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. भारतावर अव्वल स्थान गमावण्याची नामुष्की ओढवली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाला हे अव्वल स्थान गमवावे लागले आहे. अव्वल स्थानावरुन भारतीय संघ थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागंलं. भारतीय संघाचा २२७ धावांनी दारुण पराभव करत इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० नं आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघानं भारत दौऱ्याची दण्यात सुरुवात केली आहे. या पराभवासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. विराट कोहलीची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.
चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. ७० टक्केसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी टक्के आहे.
इंग्लंड संघानं ११ विजय आणि चार पराभव स्विकारले आहेत. तर तीन सामने अनिर्णीत राखले आहेत. इंग्लंड संघाच्या नावावर ४४२ पॉईंट असून त्यांची विजयाची टक्केवारी ७०.२ इतकी आहे. भारतीय संघानं ९ विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना अनिर्णीत राखला आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ६८.३ इतकी आहे.
A huge win over India in the first Test has propelled England to the top of the ICC World Test Championship standings 👀#WTC21 pic.twitter.com/8AaC8XMrjr
— ICC (@ICC) February 9, 2021
