‘प्लास्टीक विरोधात कारवाई पुन्हा सुरू’ – पर्यावरण मंत्री रामदास कदम
प्रश्नोत्तराच्या तासात प्लास्टीक बंदीबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवडणुकीच्या काळात मंदावलेली प्लास्टीक विरोधात कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील. अशी माहिती विधानसभेत दिली. ‘मुंबई महापालिकेने प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात तपासण्या सुरू करून कारवाई केली. मात्र आचारसंहितेमुळे कारवाईचे काम थाबंले. आता पुन्हा ही कारवाई सुरू झाली आहे. ठाणे मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, दादर फुल आणि भाजी मार्केट इथे पुन्हा कारवाई सुरू केली. त्यामुळे येत्या आठ दिवसात या कारवाईचे परिणाम दिसू लागतील’, अशी माहिती कदम यांनी विधानसभेत अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.