Maharashtra GovPoliticsमुंबई

देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकारातील चार मोठे नेते दिल्लीत दाखल;चर्चेला उधाण

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकारातील चार मोठे नेते दिल्लीत पोहोचल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेले आहे.

सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन सत्ता हस्तगत करण्यात कॉंग्रेस व इतर पक्षांना भाजपने खूप मागे टाकले आहे. कर्नाटक व मध्यप्रदेश हे दोन मोठे राज्य विरोधकांकडून हिसकावून घेणाऱ्या भाजपने राजस्थाननंतर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याच्या बातम्या येत आहेत.

महाविकास आघाडी सरकार टिकेल की पडेल याच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. अशावेळी फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडीक व रणजितसिंह निंबाळकर तिघांना आणि जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांना घेउन दिल्ली गाठली आहे. साखरेच्या मुद्यावर ही बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button