Sportsक्रिकेटक्रीडा

प्रितीच्या पंजाब संघात सामिल झाला शाहरुख खानं

आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी चेन्नईत सुरू असलेल्या खेळाडूंच्या लिलावात ख्रिस मॉरिसने १६ कोटी २५ लाख इतकी सर्वोच्च बोली लावली. राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. भारतीय खेळाडूंमध्ये प्रथम श्रेणी खेळणाऱ्या एका खेळाडूला बेस प्राइस पेक्षा २५ पट अधिक बोली लावून विकत घेण्यात आले.

आयपीएलच्या लिलावात भारताच्या युवा खेळाडूला २५ पट अधिक बोली मिळाली आहे. २० लाख बेस प्राइस असलेल्या शाहरूख खान याला पंजाब किंग्जनेन तब्बल ५ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले.

तामिळनाडूचा युवा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहरुख खान याला आपल्या संघात घेण्यासाठी संघमालकांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. पंजबा आणि आरसीबी या दोन्ही संघानं शाहरुख खान साठी मोठी बोली लावली. मात्र, प्रितीच्या पंजाब संघानं ही बोली जिंकली.  नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत तामिळनाडूचा शाहरुख खानच्या कामगिरीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. पंजाब संघात के. एल राहुल, ख्रिस गेल आणि मयांक अगरवाल यांच्यासारख्या दिग्गजांसोबत शाहरुख आता आपलं नशीब अजमाणार आहे.

बीसीसीआयद्वारे नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शाहरूखने २२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. तामिळनाडूच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. शाहरूख संघ दबावात असताना मोठे शॉर्ट खेळू शकतो. मधळ्या फळीतील फिनिशर अशी त्याची ओळख आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button