दलाई लामा यांनी घेतली कोविड -१९ ची पहिली लस
अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना शनिवारी धर्मशाळा येथे कोविड -19 या लसीचा पहिला डोस देण्यात आला.
सकाळी 7:10 वाजता त्यांना झोनल हॉस्पिटलमध्ये डोस मिळाला. सुमारे अर्धा तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवले होते
गेल्या वर्षी जानेवारीपासून 86 वर्षीय दलाई लामांनी स्वत:ला Self Quarantine ठेवले होते आणि शनिवारी ते एका वर्षानंतर निवासस्थानाबाहेर आले.
His Holiness the Dalai Lama receiving the first dose of COVID-19 vaccine at Zonal Hospital, Dharamsala, HP, India on March 6, 2021. https://t.co/CR2Pem2osO
— Dalai Lama (@DalaiLama) March 6, 2021
केंद्रीय तिब्बती प्रशासनाच्या (CTA ) राज्य व केंद्र सरकारला सुमारे दोन महिन्यांपूर्वी अध्यात्मिक गुरु यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती, असे CTA चे आरोग्य सचिव पाल्देन यांनी बुधवारी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशात सध्या 589 सक्रिय कोविड -19 प्रकरणे आहेत. राज्यात आतापर्यंत 57,428 बरे झालेत आणि 997 मृत्यू नोंदले गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी AIIMS नवी दिल्ली येथे कोविड -19 लसीचा पहिला डोझ घेतला. गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह देशातील आघाडीच्या राजकीय नेत्यांनी कोविड -19 लसीचा पहिला डोस आधीच घेतला आहे.