नाशिक
रविवारी नाशिक शहरात पाणी कपात
नाशिक शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. नाशिक शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असून इतर दिवशी दिवसातून एकदाच पाणी दिले जाणार असून येत्या रविवारपासून ही पाणीकपात लागू होणार आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याची पातळी तळाला गेली असून मागील आठवड्यातच महापौरांसह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.