
उत्तरप्रदेशहून गोदान एक्सप्रेसमधून येत असलेल्या प्रवाशाशी हुज्जत घालून मारहाण करीत रक्कम लुटणाऱ्या तृतीयपंथीयापैकी कल्याण येथे राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.12 सप्टे.रोजी गणपतीच्या नावाने भिक मागत असताना गोदान एक्सप्रेसने येणारे चार्टड अकौंटट प्रमोदकुमार गुप्ता रा.नवीमुंबई यांना मारहाण करून त्यांच्याकडील 1 हजार रुपये लुटले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली.
नवी मुंबई,बेलापूर येथे राहणारे चार्टड अकौंटंट प्रमोदकुमार गुप्ता 12 सप्टेंबर रोजी रात्री गोदान एक्सप्रेसने ठाण्याकडे येत होते.तेव्हा,कल्याण स्थानक सोडताना डब्यात शिरलेल्या दोघा तृतीयपंथीयानी टाळ्या वाजवून गणपती बाप्पाच्या नावाने प्रवाश्यांकडे भिक मागण्यास सुरुवात केली.त्यांच्यापैकी एकाने गुप्ता यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी विरोध केला.त्यावर या तृतीयपंथीयाने बीभत्स वर्तन करून गुप्ता यांना मारहाण केली.तसेच,ठाणे स्थानक येण्यापुर्वीच गुप्ता यांच्या खिशातील एक हजाराची रक्कम काढून पळ काढला.याप्रकरणी,गुप्ता यांनी,पाठपुरावा केल्यानंतर एका तृतीयपंथीयाला अटक करण्यात आली.


