ElectionMaharashtra Gov

निवडणूकीची तारीख निश्चित | महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान | २४ ऑक्टोबरला निकाल

निवडणूकीची तारीख निश्चित | महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान | २४ ऑक्टोबरला निकाल

महाराष्ट्र राज्याच्या १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात २१ ऑक्टोबर रोजी निवडणूका होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहिर होतील.त्यामुळे दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
ह्यावेळी सुमारे ८.९४ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.निवडणूकांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

मतदान – २१ ऑक्टोबर

मतमोजणी – २४ ऑक्टोबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button