क्राईम न्यूजपुणेसोशल मीडिया

खडकीत चर्चमध्ये चोरी! चोरटयांनी दानपेटीही पळवली !!

पुणे: खडकी परिसरात काही चोरटयांनी चक्क चर्च मधून दानपेटी चोरल्याची धक्कादायक घटना धाडली आहे. या प्रसंगी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आणखी एका शाळेत पाण्याची मोटार चोरल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. खडकी परिसरात काही अज्ञात चोरांनी चर्च मधून दानपेटी चोरून नेताना जेसू अँथनी (वय ६८) यांनी पहिले आणि लगेच त्यांनी तक्रार नोंदवली. चर्चच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरटयांनी दानपेटीतील तीन हजारांची रोकड आणि दानपेटी असा चार हजारांचा ऎवज चोरून नेला. पोलीस हवालदार हनुमंत जाधव हे अधिक तपास करत आहेत असे माहितीनुसार कळते.

तसेच याच काळात खडकीत आणखी एक चोरीचा प्रकार घडल्याचे कळते. खडकी परिसरात शाळेच्या बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी बसवलेली मोटार चक्क काही चोरटयांनी पळवून नेली. नरेंद्र भाईलाल (वय २८) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारी नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली आहे. ही मोटार शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्यात आली होती. तीच चक्क चोरी केली ही आश्चर्यजनक बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button