पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मध्यस्तीमुळे पत्रकारांचे बेमुदत उपोषण मागे
खेडमधील अवैध मटका व जुगार धंद्याविरोधात आवाज उठवणारे पत्रकार सिध्देश परशेट्ये व अनुज जोशी यांना अवैध धंदे करणाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाण करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात खेडसहीत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव २० जून २०१९ रोजीपासून बेमुदत उपोषणास बसले.

या मारहाण प्रकारणाची गंभीर दखल घेत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी २० जून २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र दिले. सदर प्रकरण विधानभवनामध्ये आक्रमकपणे मांडून २४ जून २०१९ रोजी पर्यावरणमंत्र्यांनी मुख्यामंत्र्यांची भेट घेऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

रामदास कदम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे व योगेश रामदास कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबतची संपू्र्ण सविस्तर माहिती योगेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन दिली. यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी रामदास कदम व योगेश रामदास कदम यांचे आभार मानून सदर उपोषण स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.