बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC
बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करा – पालिका आयुक्त प्रवीण परदेशी
पालिकेच्या वाहनतळांवर स्थानिक रहिवाशांना आता अर्ध्या किंमतीत आपल्या गाड्या पार्क करता येणार आहेत. पालिकेच्या सध्या असलेल्या 27 वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल. शिवसेनेच्या मागणीनंतर घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित विभागांना दिले.
मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार 7 जुलैपासून सर्व विभागांत सुरू केलेल्या कारवाईत दररोज एक ते दोन लाखांचा दंड वसूल केला जात आहे.
