Sportsक्रिकेटक्रीडा

अश्विनचं इंग्लंड विरुद्ध शानदार शतक, बनवला हा रेकॉर्ड

फिरकीला मदत करणाऱ्या आन्हानात्मक खेळपट्टीवर अष्टपैली रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अडखळत होते. मात्र, आर. अश्विन यानं संयमी फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आर. अश्विनचं कार्किर्दीतील आपलं पाचवं शतक झळकावलं आहे. याआधी वेस्ट इंडिजविरोधात शतकी खेळी केली होती. पहिल्या डावात रोहित शर्मानं शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात अश्विन यानं शतकी तडाखा लगवला.

गोलंदाजी करताना अश्विन यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं होतं. अश्विन यानं गोलंदाजी करताना पाच बळी घेतले होते. तर आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शतकी खेळी केली. अश्विन यानं १३५ चेंडूचा सामना करताना शतकी खेळी केली. या शतकी खेळीदरम्यान अश्विन यानं १४ चौकार आणि एक षटकार लगावला

अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली आहे. अश्विन यानं सुरुवातीला कर्णधार विराट कोहलीच्या मदतीनं संघाचा डाव सावरला. कोहली बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढवली. तचेस आपलं वैयक्तीक शतकही पूर्ण केलं. अश्विन याचं हे पाचव शतक आहे. याआधी वेस्ट इंडिजविरोधात अश्विन यानं चार शतकं झळकावली होती.

चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या आर अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजीसह शानदार शतक झळकावले. अश्विनने कसोटी कारकीर्दीत पाचव्यांदा शतक ठोकले. या शतकी खेळीमुळे आर अश्विननेही एक मोठी कामगिरी बजावली.अश्विन हा आशियातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने शतकीय खेळीसह डावात पाच विकेट घेतले आहेत. इयान बोथमने 5 वेळा हा पराक्रम केला आहे. त्याचवेळी, साकिब अल हसन, गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस यांनी 2-2 वेळा हे कामगिरी केली आहे. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध याआधीचे चारही शतकं ठोकले आहेत. पाचवं शतक त्याने इंग्लंड विरुद्ध ठोकलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button