Maharashtra Govशिक्षण
आदित्य ठाकरेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधान भवनात भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या विषयांसंदर्भात निवेदन दिले असून या निवेदनात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची आणि पुनर्मुल्यांकनाची फी कमी करणे, शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी (Self Defense) च्या कार्यशाळा सुरु करणे आणि विद्यार्थ्यांना कँटीन, पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये आणि अभ्यासपूर्ण प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी उपायोजना करण्याचे सुचविले आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण मंत्र्यांनी या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे आश्वासन दिल