साउथ इंडिअन स्टार महेशबाबू आता लवकरच बॉलीवूड मध्ये!
गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची एण्ट्री झाली आहे.
‘रामायण’ या चित्रपटात दीपिका माता सीतेच्या भूमिकेत दिसणार होती तर हृतिक रोशन प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार होता. पण दिलेल्या वृत्तानुसार, आता महेश बाबूची या चित्रपटात एण्ट्री झाली असून तो मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महेश बाबूला चित्रपटाची कथा आवडली आहे. पण अजूनही त्याचा होकार हा आला नाही आहे.त्यामुळे महेश बाबू चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच चित्रपटात आता हृतिक रावणाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

