मनोरंजनसेलिब्रिटी

होणार सून..’ फेम शशांक केतकर याचे छोट्या पडद्यावर पुनरागमन !

शशांक केतकर हा ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून आला आणि त्याने सर्वांच्या मनाचा ताबा घेतला. तरुणींचा चोकलेट बॉय अभिनेता शशांक केतकर हा या मालिकेतून घराघरात पोहचला आणि लोकप्रिय झाला. या मालिकेतील त्याची ‘श्री’ ची भूमिका ही कोणीच विसरू शकत नाही. पण, या मालिकेनंतर तो छोट्या पडद्यावर काहीसा कमीच आला. पण आता मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे तो आता पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
 
अभिनेता शशांक केतकर याची लवकरच ‘पहिले न मी तुला’ या नावाची मालिका येत आहे. परंतु, या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असेल याची मात्र काहीच कल्पना नाही. या मालिकेत शशांक सोबत अभिनेता आशय कुलकर्णी सुद्धा दिसणार असल्याची शक्यता आहे. तसेच या मालिकेतून नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले सुद्धा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या मालिकेचा टीझर हा त्याने त्याच्या सोशल मिडीयावर शेयर केला आहे.
 
त्याने हा टीझर शेयर करताना असे कॅपशन दिले आहे की, “पहिले न मी तुला हे गाणे जसं सगळ्यांच्या आवडीच , तशीच हि नवीन मालिका आणि भूमिका सुद्धा सगळ्यांच्या आवडीची होऊदेत हीच बाप्पा चरणी प्रार्थना !” १ मार्च पासून ही मालिका सुरु होत असल्याची सूचनाही त्याने दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button