Health & Fitnessपुणे

‘डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळणार नाही’ – ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील डॉक्टर, रुग्णालय, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांच्यावर सातत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहे. यावर उपाययोजना म्हणून या हल्लेखोरांना उपचार नाकारण्याचा निर्णय ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या राज्य शाखेने घेतला. त्यासाठी पहिला ‘व्हायलन्स रजिस्ट्री’ महाराष्ट्रात तयार होत असून, पुढील तीन महिन्यांमध्ये ती सक्रिय होईल. याबाबत अधिक माहिती देताना ‘आयएमए’ च्या राज्य शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,’राज्यातील डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या हल्ल्याची एकत्र नोंद ठेवण्याची कोणतीच व्यवस्था सध्या नाही. याची राज्य पातळीवर माहिती संकलित करण्यासाठी ‘व्हायलन्स रजिस्ट्री’ तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ‘आयएमए’ च्या २१० शाखांमध्ये झालेल्या कोणत्याही हल्ल्याची माहिती तातडीने या रजिस्ट्रीमध्ये नोंद होईल. घट्नेची तारीख, ठिकाण, वेळ, त्याची व्याप्ती किती, या माहिती बरोबरच संशयित हल्लेखोरांचे छायाचित्र, त्यांचे नाव आणि त्यांच्या बाबतची उपलब्ध माहिती या ‘रजिस्ट्री’मध्ये देण्यात येईल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button