‘केईएम’बाबतच्या बातम्या आणि व्हीडीओमुळे बीएमसीची गैरहजर कर्मचाऱ्यांना तंबी
मुंबई : ‘केइएम’ रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी परिचारिकांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने येथील निवासी डॉक्टरांवर ताण येत असल्याची व्यथा केईएमच्या डॉक्टरांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे. बाबतच्या बातम्या आणि व्हीडीओमुळे बीएमसीने गैरहजर कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे .
बीएमसीने केईएमच्या डॉक्टर आणि कर्मचार्यांना साथीचे नियंत्रण कायदा व आपत्ती नियंत्रण कायद्यानुसार 72 तासाच्या अंतिम नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांनी कामावर न येणाऱ्या कर्मचार्यांना बडतर्फ करून त्याच्या जागी त्वरित र नवीन व्यक्तीची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान केइएमच्या अतिदक्षता विभागात ३५ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. परंतु यांना पाणी पाजण्यासाठी, जेवण भरविण्यासाठी, शौचास नेण्यासाठी परिचारिकांपासून वॉर्डबॉयपर्यंत कोणीच उपलब्ध नाहीत. आम्ही तिघांशिवाय येथे कोणीही आलेले नाही. रुग्णांच्या प्रकृतीची सातत्याने देखरेख करणे, त्यांना अत्यावश्यक औषधे देणे ही परिचारिकांची कामे आहेत. पण आम्ही यामध्येच गुंतले आहोत. अतिदक्षता विभागातील ३५ रुग्णांना तीन डॉक्टरांनी हाताळणे कठीण असून प्रचंड ताणाखाली आम्ही काम करत आहोत. याविषयी वारंवार वरिष्ठांना कळविले असूनही याची कोणीही दखल घेतलेली नाही. प्रत्येक वॉर्डमध्ये थोडय़ाफार फरकाने काही दिवसांपासून हीच अवस्था आहे.
परंतु कोणीही मदतीसाठी आलेले नाही, असे वास्तव डॉक्टरांनी या चित्रफितीत मांडले आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या केवळ दीड टक्के आरोग्य यंत्रणेवर खर्च करणाऱ्या सरकारला या डॉक्टरांनी याचा जाब विचारला आहे. मोठय़ारुग्णालयात ही अवस्था आहे तर इतर रुग्णालयांची अवस्था काय असू शकेल याचा अंदाजही लावता येणार नाही, अशी प्रतिक्रिया या डॉक्टरांनी दिली आहे. यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकलेला नाही.
